Thursday 4 July 2013

माणुस मारला, माझा माणुस मारला...।।

नाही हिंदू गं मारला,नाही मुस्लिम मारला
माणुस मारला, माझा माणुस मारला
माझा हुसेन मारला, माझा किसन मारला
माणुस मारला, माझा माणुस मारला...।।

आमचं काळीज पारवा,जसा उबदार गारवा
आमच्या चाऱ्‍याच्या चोचीत बाँब भुकचा पेरला...।।

आले जुलुस झेंड्याचे,आले कळप गेंड्याचे
त्यांनी माणसातला माणुस ठेचून ठेचून मारला...।।

त्यांची हत्यारं रक्ताची,फौज बांधली भक्तांची
त्यांनी सिंहासनापुढं खऱ्‍या देवाला कापला...।।

त्यांच्या सभांना ही गर्दी गोष्टी ऐके भूका दर्दी
केलं खऱ्‍याचं ग खोटं त्याचा मेंदू फिरवला...।।

धर्म ठेवा की घरात,का ही काढली वरात
खरा धरम घामाचा, त्याचा इतिहास जागवा
माणुस जागवा, माझा माणुस जागवा....।।
----- संभाजी भगत.

Monday 8 April 2013

तमन्ना भाटीया Tamanna Bhatiya

मुली

४-५ मुली एकत्र बसून गप्पा मारताना म्हणू शकतात ;
"तुझा भाऊ किती Handsome आहे गं.....ओळख करून दे ना...."
.
.
.
.
पण
.
.
४-५ मुलं एकत्र बसून गप्पा मारताना एखाद्या मित्राला कधीच नाही म्हणणार;
"तुझी बहीण खूप सुंदर दिसते.....ओळख करून दे ना...."
.
.
"हे आहेत मुलांचे संस्कार..... :

Saturday 6 April 2013

भांडण

टी व्ही समोर बसून
उगाच चैनेल चाळत होतो
बायकोने विचारले-
टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !

लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवी ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
अस काहीतरी हव...
...एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

रविवारी फिरायला जाऊया का? विचारलं...
मला महागड्या जागी घेऊन चला म्हणाली-
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
काय मी भयंकर दिसतेय !!!
तुमच मत काय आहे ?
मी म्हणालो
तुझा चष्म्याचा नंबर..
परफेक्ट आहे!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

मी विचारलं -
वाढदिवसाला कुठे जाऊ या ?
ती म्हणाली
जेथे खूप दिवसात मी गेलेली नाही !
मी तिला स्वयपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

Thursday 8 November 2012

गरिबी

एक श्रीमंत वडील त्याचा मुलाला एका गाँवात गरिबी काय असते ते दाखवायला
घेऊन जातात.....
ते गांव फिरुन झाल्यावर ते श्रीमंत वडील त्याँचा मुलाला गरीबी बद्दल विचारतात,,,
मुलगा: आपल्याकडे १ कुञा आहे तर त्याँचाकडे ४ कुञे आहेत,,
आपल्याकडे एक स्विमीँग पूल आहे तर त्याँचाकडे मोठी नदी आहे,,
आपल्याकडे ऊजेडासाठी लँम्प आहेत तर त्याँचाकडे आकाशतले तारे आहेत,,.
आपल्याकडे जमिनीचा एक छोटा तुकडा आहे तर त्याँचाकडे मोठे शेत(जमिनीचा
मोठा भाग)आहे,,
आपण धान्य विकत घेतो तर ते स्वतः धान्य उगवतात ...
हे ऐकुन त्या मुलाचे वडील निशब्द झाले
आणि
नँतर मुलगा बोलतो:
"धन्यवाद बाबा, आपण किती गरीब आहोत हे दाखवल्या बद्दल.".......